कधी कधी असे घडते घडू नये असे घडते
हसू खुलून ओठी पण... हसूत दुख रे लपते......\\धृ\\
अबोलसे वळण घेते अवचित जिंदगी अपुली
मनात उमटल्या शल्यास, बोल मौन का फुटते
कठोर वेदना अलवार टोचती फुलांवरल्या
दवात ओघळूनी थेंब मोतिया मनी सलते
हसू खुलून ओठी .......................................\\१\\
मिटून घेतले डोळे मिटून मन कसे घेवू
थमून श्वास जातोच साठवण न ती थमते
दिसून येत नाही चेहर्यात, माणसे शोधा
सपाट चेहर्यावरती सुसाटशी गती दिसते
हसू खुलून ओठी .................................\\२\\
असे तसे कधी घडते तसे बरे कधी घडते
जुळून एक गाठीशी तुटून ही बया जुळते........................\\धृ२\\
विशाल लोणारी
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY