पाऊस येतो ,पाऊस येतो
देतो आनंदाला उधाण
तृप्त करतो धरा ही
मिटवूनी तिची तहान
पाऊस आल्यावर ही
ते का घरातंच थांबायच
खिङकीतून सरीँना ओझरतं बघायचं . . .
पाऊस येतो पाऊस येतो
पाना ,फूले ,वेलीँसवे
वारा ,ङोँगर ,झर्यासवे
मेघांसवे ,भिजरे गाणे गावे बेभान
पाऊस येतो पाऊस येतो
देतो आनंदाला उधाण
पाऊस येतो पाऊस येतो
ढगांच्या काखेत आठवणी घेऊन
दप्तर घेऊन पळणार्या ,चिखलात धङपङणार्या
मराठीच्या तासाला , बालकवीँची कविता ऐकणार्या
भिजून वर्गात बसल्यावर , रोजचेच चेहरे ही कधी
नितळ ,ओले वाटताना
अशातच त्याच्या-तिच्या नजरभेटीची . .
कँटीँनच्या चहावर बोळवण जमणार्या . . .
गुलजारच्या पाऊसात
समरसत जाताना . . .
पाऊस येतो ,पाऊस येतो
मृगजळाच्यापाठी माझे धावते भान
पाऊस येतो ,पाऊस येतो
आयुष्याची संध्याकाळ असते
इच्छा ,अपेक्षा . . . . .
मनाची ओझी ,सोङून देत. . . . . .
एकटंच मन आणतं थेँब झेलून
मनातल्या मनात मोजणं
तो मिर्गीच्या गारव्याचा हिरवा हर्ष ,
बसायचं मोजत
जोपर्यँत , सोसवता आहे त्राण
पाऊस येतो ,पाऊस येतो
शेवटी तुटला देहाशी प्राण
पाऊस येतो ,पाऊस येतो
देतो आनंदाला उधाण
तृप्त करतो धरा ही मिटवूनी तिची तहान
विशू . . . . . .
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY