प्रेम करणे हा गुन्हा आहे !
ज्याची शिक्षा एकाच , खून
प्रेमाला प्रेम म्हणूच नये
प्रेम करणार्यांचे ,
जल्लाद झालेल्यांनी .
ती पाहता बाला
कलेजा खल्लास झाला
हि उक्ती खरी ठरावी
एवढी निर्घुण वेळ
प्रेमावर का बरे यावी ?
प्रेमात कुणाची मती
दुष्ट का रे घडावी ?
भिन्नलिंगी आकर्षणच
जर का प्रेम आहे ? मग
काय , मी केली ती फक्त श्ब्द गुंफण आहे ?
सूर्य कधीतरी संध्याकाळी उगवला असता
जर , मोकाट सांडांना
प्रेमाचा गर्भार्थ कळला असता
आणि या जगात ,
कवींचा जन्मच झाला नसता .
विचार करा , प्रेम म्हणजे नक्की काय आहे /
सोडा रे अशी
चेष्टा करणे प्रेमाची
ठोठावता नका हो करू
प्रेमावर तो वार
आजकाल का लोक
प्रेमामुळे , प्रेमासाठी जीवघेणे होत आहे
यांना प्रेम कितपत समजते
मला शंका आहे ..
आई – वडील , भाऊ ,बहिण
काका-काकू , मामा-मामी , मावशी-मावसा
यांचे प्रेम , प्रेम नसते का यार ....
संस्कार हे प्रेमाचे नसतात का ?
बोलून प्रश्न सुटत नसतात का ?
आजकाल लोक जीवघेणे होत आहे
प्रेम करणे हा , अदखलपात्र , अजामीनपात्र
डायरेक्ट भा .द . वि .३०७ अन्वये गुन्हा ठरत आहे
प्रेम करा नको रे गुन्हा
नका बोलायला लावू आता पुन्हा
प्रेम करणे हा गुन्हा आहे !
विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY