Vishal Lonari
रोमरोमांत माझ्या
होतो तुझ्या अस्तित्वाचा
मुक्तपणे संचार आता . . .
माझ्या गात्री मी कुठेही उरलो का आहे ?
तु अधिक होत गेली माझियांत अशी अमर्याद
स्वत:शीच काही प्रमाणात उणा आहे . . .
आठवणींच्या गुलगुच्छाने मन गलेलठ्ठ जरी
क्षीण क्षीण ङोळ्यांतून आश्रु पाझरत आहे
संसार मांङावयाचे स्वप्न उराशी माझ्या
पाठी वास्तव मात्र आपले दुराव्यात आहे
उघङझाप पापण्यांची आणि ह्रद्याच्या कवाङ्यांची
श्वासागणिक नाव मात्र तुझेच नसांत धावत आहे
चेहर्याँत हरेक मला लोभस
भास तुझ्या लावण्याचा
माझ्या विद्रुप जगी अन् कुठेही उरले कोण आहे ?
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY