साधू म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर मला खूप भावलेले होते. ते असे होते की ज्याला कोणाताच मोह नाही, वैराग्य पावलेला, मानवी षडरीपू मुक्त झालेला आणि संसारातून विरक्ती स्विकारलेला असा तो साधू. लहानपणापासून याच व्याख्येवर विश्वास ठेवत आलोय, अशा विरक्तीस वाहून घेतलेल्या साधु लोकांचा मेळा म्हणजेच 'कुंभमेळा' वयापरत्वे हे देखील मला समजावले गेले, अन कायम मनात घोळत राहिले. दरम्यान अध्यात्म ही अशी एक दिव्य चमत्कारिक शक्ती आहे जी आत्मसात करता भोवतालच्या व्याधीसक्त अशा रहाटगाड्यातून मुक्तता देते, माझ्यामते श्रद्धा, अंधश्रद्धा पूजा-अर्चना या पलीकडे अध्यात्माची संज्ञा आहे, खरे सोपे शब्दात बोलायचे तर अध्यात्म म्हणजे ती अवस्था जी आत्मयाशी संवाद घडवते. मला असेही वाटायचे की साधू असाच असेल.
मात्र, वर वर्णित माझ्या संकल्पनेला गेल्या काही वर्षात देशातील तमाम साधू वर्गाने जबरदस्त तडे दिलेत, साध्वी प्रज्ञासिंह, आसाराम बापू, रामदेव बाबा असे अनेक कलंदर, मस्तमौला, तत्वखोर लोकांनी माझ्या मनातील साधुंच्या व्यक्तिचित्रात अनेक भडक, चमकदार रंग भरलेत, मानवी स्वभाव व्याधी असलेला 'अहंकार' साधूसही लगडतो अन भंपकबाज असतो तो साधू. हेच मत मग कायम बनले. आता येता-जाता मी या तथाकथित साधू लोकांची किळस करत सुटलो, त्यांच्या बोलण्यावर मी छी थू करत होतो अजूनही करतोच आहे. तर सो कॉल्ड 'साधू' हा आपल्यातल्याच एखाद्या महादूसारखा असतो, असे मानून जगु लागलो.
पुण्यातल्या तरुनाईला झिंगवणारा, शैक्षणिक धर्तीवर सांस्कृतिक आणि आधुनिकतेचाही बाज गर्वाने मिरवणारा 'जंगली महाराज रोड' या जंगली महाराजांचे दास ते जंगलीदास, यंदाच्या कुंभमेळामध्ये त्यांना बघून मी ही चकित झालो होतो. मस्तकात प्रचंड दिव्यवेदना होऊन त्यातून विस्तीर्ण प्रकाश बाहेर पडला आणि नववीत शिकत असलेला एक मुलगा परमात्मा शोधायला म्हणून घराबाहेर पडला, मग जंगली महाराजांकरवी दीक्षा घेत तो मुलगा पुढे जंगलीदास म्हणून ओळखला जावू लागला, असे या महाराजांच्या अवतारकार्याबद्दल बोलले जाते. लोक म्हणतात 'गोसाव्याचा वंश विचारू नये' पण खरे काय कळल्याशिवाय माझे समाधान होत नाही.
गेली अनेक वर्षे आईसोबत या जंगलीदास महाराजांच्या दर्शनास कोकमठाण येथे जात आलोय. हे पहा तुम्हाला स्वखुशीने आस्तिक वा नास्तिक बनाता येते मात्र मी लहानपनापासूनच आईवेडा, ती नेत गेली मी जात राहिलो. तिथे प्रभाव पाडणाऱ्या अनेक गोष्टी मला दिसल्यात, जसे की दक्षिणा ठेवा अशी अजिबात ओरड तिथे भाविकांवर केली जात नव्हती, कोणीही तिथे मंत्र-तंत्र बोलत सोने, पैसा, धागा-गंडा काढून देत नव्हते. त्या आश्रमात विशेष अशा प्रकारे माझी पूजा करा असे जंगलीदास महाराज कधीच बोलत नाही, सत्संग जरी असेल तरी महाराज एक चुकर शब्दही तत्वज्ञान सांगत नाही. कोणाही भाविकांच्या समस्या असो ते फक्त एकच उपाय सांगतात 'ध्यान करा ध्यानी बना' आणि ते खरच आहे. अर्थात त्यांचे भक्तगण तरीही हार, नारळ, फुले, प्रसाद अर्पण करतात जो महाराज आलेल्या लोकांतच वाटतात, आल्या प्रत्येकाला अन्नछत्रात प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ देत नाही, ही सेवा अर्थात मोफत असते, याचे अर्थकारण जुळलेय ते भाविकांनीच अन्नदान केल्याच्या पैसा आणि धान्याशी, अशा संतास त्रास देणाऱ्याला महंत कसे म्हणणार.
ध्यान याचा अर्थ अशी गोष्ट करण्यात गढून जाणे जी तुम्हाला सर्व चिंतामुक्त करेल, निर्मितिचा आनंद देइल, सुखाची खरी अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल. ध्यान म्हणजे एकाग्र होऊन थेट आत्मचिंतन करणे होय, मी कधी कधी कविता लिहिण्यात बूडून गेल्याचे खचितच स्मरते. मी काय किंवा कोणीही कलावंत काय त्याच्या या विचारप्रवणात तल्लीन होती म्हणजे काय ? तो ध्यानस्थच होतो, समाधीस्थच तर होतो ना. विज्ञान ही याच गोष्टीस दुजोरा देइल, आपल्यास प्रतिभीत असलेली गोष्टीतून शेवटी सर्व मनाचा थकवा घालवायला स्वतःशी झालेली वाटाघाटी म्हणजेच ध्यान, आणि हेच जंगलीदास महाराज संदेशरुपात सांगतात.
आता, एक मजेशीर गोष्ट सांगतो जेणेकरुन हे पटेल की जंगलीदास महाराज खरे संत परंपरा चालवणारे आहे. स्वतःस साधू बोलणारे संतात मोड़वून घेणारे बाबा- बुवा रोज सकाळी टीव्हीवर कृपा करतात, बडबड, कचर कचर करून अनेकांच्या दिवसाची सुरुवात करतात, पेंडट विकतात, हो की नाही सोशल मीडिया व्यतिरिक्त कुठल्याही टिव्ही चॅनेलवर साधा फोटो तरी पाहायला आहे का या महाराजांचा.
तेव्हा खरोखर योगी, फकीर, बैरागी, ध्यान ऋषी असलेल्या भक्तांच्या लाडक्या 'बाबांना' व भक्त लोकांना, कुठल्या त्या पुचाट, पाशवी, दरीद्री आणि अहंकारी, खोट्या, घाणेरड्या साधुंनी गंगेत स्नान व पूजा करावयापासून आडवले, का तर परवानगी घेतली नाही म्हणून गोदावरी सामान्य नागरिकांना उपलब्ध होत नाही, हा घोर पातकी अन्यायच. याचे मुळ कारण शोधायचा, या परिस्थितीचा ऊहापोह केल्यावर लक्षात आले.
या जंगली आश्रमात कुणीही पहा शुभ्र वस्रातच दिसेल, पांढरा रंग शांततेचे द्योतक आहे, आणि हेच कारण की इथे सगळे पांढरे सुती वस्त्र परिधान करतात. अध्यत्माच्या शोधासाठी उभे आडवे गंध, जाड-राट जटा अंगभर मेलेल्याची राख माखवायची काहीच गरज नसते ना पण हे कुंभमेळात नाशिक मळवायला आलेले साधू लोकांना कसे चालेल, अग्यानदासला हे कसे सहन होईल, जंगली आश्रमात बौद्धिक ज्ञान शिवाय शरीरसौष्ठव प्रशिक्षण ही देतात, मात्र कोणावरही तलवार घेउन धावणे शिकवले जात नाही आणि हे तीनपट साधू तर धर्मरक्षणासाठी मारायला कमी करत नाही, हे एक प्रकार अतिरेकी वागणेच नाही का, आणि हो पुण्यात म्हणे कुठली ती 'सनातनी' लोकांची संस्था आहे जी धर्मरक्षणार्थ चालते असे बोलतात, नाही मी काही सुचवत नाहिये हो.
तसे बघायला गेले तर मोठ्या प्रमाणात असलेल्या जंगलीदास महाराज यांच्या भक्तांचे इतकेच चुकले की ते इथे कुंभमेळा म्हणून आले, जरी शहरात संपूर्ण कार्यक्रम प्रदर्शीत केला असला तरी नीट संपूर्ण कल्पना देणे. पोलीसही यात माती खातात, सदर गोंधळ सुरु झाल्यावर 'साहेबांना येउ दे अशी भूमिका ते घेत बसले, इंद्रदेवाचीच मिरवणूक असल्याचा गैरसमज झाला आणि शेवटी साधुंपुढे सपशेल टाकलेली नांगी यामुळे काल साधुग्राम तणावग्रस्त ठरले. हलकट साधू पहाटे निघून येत आंघोळ करतात तर दुपारी दोन वाजता उन्हात रणरणत निघालेल्या सामान्य नागरिकांना मात्र श्रद्धा पाळण्यापासून मज्जव ! अरे हा देश आहे की मस्करी ? वर्षानुवर्षे साधू हा भोंदवणारा एक प्रकार आहे असे मानत जगत असताना संतवर्तन असलेल्या योगीवर असा प्रसंग गुजरलेला पाहून भयंकर चीडच येउ शकते. पण त्या भावनेचा रंजीत पाठ इथे वाहवणे पटे ना.
शेवटी इतकेच म्हणेल की माणूस जगवणे त्याची भूक,तृष्णा शांत करणे हेच खरे संतकार्य आहे. ते प्रत्येक जीवसृष्टीवरील मानवाने आपापल्यापरीने केले पाहिजे त्यालाच खरा संत गणता येईल, बाकीचे आहेतच निव्वळ करमणुकीय 'महादू'
विशाल लोणारी
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY