Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

स्ट्रेटनीँग ,स्टेप्सकट

 

स्ट्रेटनीँग ,स्टेप्सकट
अमुक ईश्टाईल ,तमुक ईफेक्ट
ती यापैकी काहीच करत नाही
सरळसोट कंबरेपर्यत केस ,
लोँबकळत्या झुबक्याची वेणी
अशा वेणीतच ती छान दिसते

 

टाँप ,जीन्स ,ट्रीफोर्थ ,स्कर्ट . . . . ब्ला ब्ला ब्ला . . .
बँकलेस ,शायलेस . . !
च्यायला ! यातलं काहीच
आपल्याला आवङत नाही (आणी ती )
किती छान पाहा ,
सलवार कमीज ओढणी
सगळ्यांत कशी उठून दिसते
माझी परी ,अनारकलीत शोभिवंत असते

 

लिपस्टीक ,ग्लो ,लाईनर
कशा कशाचीच तीला
अहो ! खरंच गरज नसते
स्वच्छ ,निर्मळ चेहरा तिचा
त्याच्यावर बारीकशीच
पण टिकली असते
आणि ओठांना ती
सुहास्यानेच खूलवते . .
ङोळे ईतके पाणीदार
मला ङुंबण्या ,गङ्यांनो
तेवढेच पुरेसे होते

 

अशी ती माझी सखी
जेव्हा ही पाहतो तर
ह्रदयाला भूलवते
मनाला ती जिँकते
पुन्हा पुन्हा मला
फक्त तीच आवङते . . .

 

 

रोज रात्री फक्त तीचीच
मला प्रतिक्षा असते
पुन्हा पुन्हा फक्त तीच आवङते . . . . .

 

 

 

विशू

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ