Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

ती ला बघितलं कि

 

ती ला बघितलं कि
मला तुझी आठवण येते
तीही तुझ्या इतकीच
साधी राहणारी ,
लोभस दिसणारी ,
सोज्वळ वागायला ,
चतुर न हुशार
आदब राखणारी ...........................

 

तुझे नि तिचे
असे काय निराळे
ते वर्णन होईल ????

 

घारे डोळे ,जरासी त्यांची
ओलसर कड ..........
लांब आणि अरुंद नाक .....
रूपाने अतिशय गोरीपान (दोघीही )

 

खोल खोल डोळ्यांत
बुडायला होते ,
रेशमी ओठांना
उमलताना ,बंद होताना
माझ्याच ओठांत
मिटवून घ्यावेसे वाटते

 

केसांची वेणी
त्यावरचा तो एक गुलाब ,(त्यावर जीव जळतो ,जवळ असतो ना तुमच्या !)
मला सावलीत त्यांच्या घेवून
पाजतेस तू
प्रेमाची शराब ........
आणि , ती
ती तर , माझ्या दिलाची राणी
तिचे बॉल मंजुळ ,गोड ,सुरेल
जशी एखादी हलगी वाजवावी कुणी अशी ती

 

माझी मात्र गोची आहे ??
तुला विसरू शकत नाही
ती ला सोडू हि शकत नाही
तिच्यात ,तुझ्यातच माझं जगण आहे

 

कविता ,म्हटलं कि
तू दिसायला लागतेस
तुझ्यावरच बेस असतात न सगळ्या
आणि तू दिसलीस कि
कविता सुचू लागतात

 

म्हणून मी म्हटले

 

ती ला बघितलं कि मला
तुझी आठवण येते
तुला विसरू शकत नाही
ती ला सोडू हि शकत नाही
तिच्यात ,तुझ्यातच माझं जगण आहे

 

 

विशू

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ