तुझ्या रूपास भाळूनी
अनी जीवास जाळूनी
तुला चोरून पाहे हा
तुला लाजून पाहे हा
नभातूनी ग चंद्रमा
तुझ्या ओठास लाली ती
अनाराची पिलो मी तर
कसा तो धाक दावी तो
नभातूनी ग चंद्रमा
तुझ्या गीतांत मी आहे
तुझ्या सूरांत मी आहे
तु ही आहे फक्त माझी
तरी वेडा हक्क सांगे
नभातूनी ग चंद्रमा
तुझे शृंगार सारे
रचीलेले शब्दान्तुनी
तुझे मन हि असे वेडे
लिहिलेल्या शब्दांसाठी
तुझी माझी पिरत माला
विणलेली शब्दांमध्ये
तरी का आस लावूनी
नभातूनी ग चंद्रमा
कवी : विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY