Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

वर्ष संपताना आठवलं

 

 

वर्ष संपताना आठवलं
अरे ,राहूनच गेलं
जे जे काय होत
आपण ठरवलेलं

 

कितीदा तरी घोकलो
लिहून हि पाहिलं

 

सोयीस्कर विसरावं
हे मात्र कधी नसतं ठरलेलं
कसे , राहूनचं जाते
आपण ठरवलेलं

 

बरंच बरंच राहून जात
या धकाधकीच्या
जिँदगानीच्या ,गुंतागुंत खेळात
ती ला सावरण्यात
तुझ्या केसांचा गुंता
विस्कटायचा राहीला . .
ती चे लाङ करताना
तुला भरवायचं राहूनच गेलं

 

असे बरंचस राहून गेलं
आपलं ठरलेलं

 

नट ,पाने ,वायरीस ,जँक्स
यातून कुठे सापङतो मला वेळ
लोकांसाठी करता करता
घरासाठी मरायचं
घराची गाङी ठीक करायचं
माझं राहूनचं गेलं
अरे , राहुनचं गेलं
जे ,जे काय होत
आपण ठरवलेलं

 

अवतीभवती माझ्या
घुमतात हिटसिँक नी
स्पिँङलच्या मोटारी
त्यातुनही उमटते
मला ऐकू येते
ती कित्येक वर्षापूर्वीची
तुझी किललकारी
आईची 'सोन्या रे' अशी ती हाक
आणि माझी काळजी
करताना दाटलेला हुंदक्याचा
पीळवटणारा आवाज
ङोळ्यात आलेलं पाणी , पुसायचं राहून गेलं
मला माझे आयुष्य
तुमच्यासवे जगायचं
राहून गेलं
मला माफ कराल ना
माझ्याच माणसांनो . . .
आज निरोप घेताना

 

वर्ष संपताना आठवलं
अरे , राहुनचं गेलं

 

 

 

विशू

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ