वेड हे मन . खूळ हे मन
माझ ऐकेना .जराही
सांजवेळी बावरूनी
जात नकळत तव घराशी
उंच पाहे दाटल्या नभी
टीपुरं झेलून घ्याया
चांदनं लूभावते ना …।।
वेस गांवाची न सोडे
गाव सारे हींडतो तो
माग शोधे रोजन्यारे
येइ जो तव अंगनाशाी
त्यास लागे ध्यास का हा
कोणि केली अशि जादू
म्हणतो आले भोग ऐसे
सांग आणाी का अताा जगु
बोलताना धीर तूटे
गात्र जाती डब डबूनी
एकटे मन मग पुन्हा ते
तव वाटेशी येवुनी बघ
उंच पाहे दाटल्या नभी
टीपुरं झेलून घ्याया
चांदनं लूभावते ना ……………।।
ये फिरूनी रंजिता तू
या जिवाला घे उराशी
मी थकूनी फार गेलो
समजवूनी . सांगुनी की…।।
सोड हे मेघांस बघने
का उगा पाहासि .अंजिरि।
जो न येनार कधि . ..वाट त्याची
साठलेले प्राण डोळा।।
खूळ. बोले बापु पाहा .
ह्या ढगांतूनी नक्की रे
येइची ये माय माझी
आज वा ऊदयास .तरि
उंच पाहे दाटल्या नभी
टीपुरं झेलून घ्याया
चांदनं लूभावते ना ……………।।
ये तु खर खर एकदा तरि
ना कधी तू ऐकले मज
ऐक हाकेला निरागस ।।।।।।।।।।।।
तूच म्हणे मनच माझे
सोनुल्यात र. माझ मन
माझ रे मन हे असे मन
ते नसे मुल ते असे मन
वेड हे मन . खूळ हे मन
माझ ऐकेना .जराही
सांजवेळी बावरूनी
जात नकळत तव घराशी
उंच पाहे दाटल्या नभी
टीपुरं झेलून घ्याया
चांदनं लूभावते ना ……………।।
विशाल लोणारी
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY