माणसाच्या आयुष्यात खूप कमी दिवस असे असतात कि जे आयुष्यभर लक्षात राहतील एवढ्या आठवणी मनाला देवून जातात . असंच काहीसं काल माझ्याबाबतीत घडलं ,कडू-गोड आठवणींच्या शिदोरी माझ्या मनास काल लाभली , निमित्त ठरलं ते सिलिकॉन आणि लोकमत आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे , या विज्ञान युगात ,संगणकाचा तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट वापर करून ,अगदी फुकटात आपण आपल्या कार्यालय-कचेरी ,दुकान ,कंपनी यांच्यात अंतर्गत सुरक्षा निर्माण करू शकतो ,कारण आपले कोण आणि परके कोण हे ओळखणे व्यावहारिक बाबींत मुश्कील आहे ,त्यांना गैरकृत्य करण्यापासुन रोखणे हे खरोखर अवघड काम आहे तेच सुलभ करण्याकरिता उपाय मी आणि माझ्या मित्रांनी सादर केला ,त्यात आम्हाला बऱ्यापैकी कौतुक ,शाबासकी ,वाहवा मिळविता आली ,परीक्षकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करता आला , हे खूप समाधान देणारे होते . मेहनत फळाला आली ,त्यातून रसाळ आठवणी ग्रहण केल्या गेल्या . जे भविष्यात आम्हाला नेहमीच तजेला देतील .
आता प्रस्तावना बस्स झाली ,खरे बोलायचे तर हे सर्व घडले त्याला कारण आहे ‘ मैत्री ’ . हो मित्रहो मैत्रीत खूप ताकद असते ,तिच्यापुढे कोणतेही संकट फारकाळ टिकूच शकत नाही . माझं ही असेच तर झाले , जेव्हा मला कळले कि माझ्यातले कौशल्य पणाला लावायची संधी मला मिळणार आहे ,तेव्हाच मी मित्रांना सांगितले ,कि आपण सर्व मिळून काहीतरी नक्कीच करू शकू ,ते उत्कृष्टच घडेल असे नाही ,पण आपली मेहनत वाया जाणार नाही , नाव कमवता येईल आणि ते चांगल्या सद्सद विवेक जागृत ठेवून ,लोकांच्या भल्यासाठी ज्ञानार्जन करून करता आले तर अत्यंत गौरवास्पद असेल , माझ्या मित्रांनाही माझे विमोचन पटले ,त्यांनीही मला साथ देण्याचे वचन दिले .
झाले ,सर्वजन तयारीला लागलो ,आमच्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेवून ,आधी लिहून काढले काय करायचे आहे ,काय साहित्य लागेल ,कुठे करायचे ,आणि त्याप्रमाणे २५० रुपये जमवले , मी आणि माझे चार मित्र काहीतरी ठरवून बसलो होतो ,शिक्षकांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही आमचे प्रेझेन्टेशन बनवले ,त्यात योग्य ते बदल पुन्हा त्यांनी सुचवले त्याप्रमाणे परत सुधारणा केली . खरतरं माझ्याकडे फक्त माहिती उपलब्ध होती ,इमजेस उपलब्ध होत्या ,पण त्या सर्व सुयोग्य पद्धतीने क्रमवार लावून ,अत्यंत आकर्षक असे प्रेझेंट करणे मला कदापि शक्य न्हवते ,कारण माझ्याकडे अद्यावत असे सोफ्टवेअर न्हवते ,मला फार भीती वाटायला लागलेली ,कारण हे सर्व तयार करणे ,आणि प्रत्यक्ष प्रदर्शनात मांडणे हे मीच स्वतःकडे ओढून घेतले होते ,पण खेळ काही जमत न्हवता ,अशात आमच्या ग्रुपमधल्या एकुलत्या एक मुलीने जी माझी बेस्टएस्ट फ्रेंड आहे ,जिच्याशी बोललं नाही असा दिवस गेला नसेल ,तिने मग माझ्याकडची माहिती घेवून मला अपेक्षित असे प्रेझेन्टेशन बनविले ,माझ्या कल्पनेपेक्षा तिची भरारी उत्तुंग ठरली , मी तिला शक्य ती सरी मदत केली ,अगदी रात्री २:३० वाजेपर्यंत ती मेहनत घेत होती ..................... हो आम्ही सर्व तहान लागल्यावरच विहीर खोदतो राव ,दोन दिवसात चमत्कार .
हम्म , मेहनतीचे दोन दिवस संपले ,सकाळी दहा पर्यंत आम्ही सर्व हॉलवर पोहोचलो ,वायरी ,लँप्टोप घेवून सगळे तयार ..परीक्षकांनी परीक्षण केले ,आणि मग प्रेक्षकांची दर्दी गर्दी वाढली .
या काळात मी आणि माझे चार घट्ट मित्र (जी एम ) एकमेकांच्या खूपच जवळ आलो ,प्रत्येकाला सहकार्य प्रत्येकजण देत होता ,मी लीडर असलो तरीही मी अजिबात हुकुम गाजवत न्हवतो ,तशी संधी मला मिळाली नाही , काहीवेळेस जरा जरा चिडचिड होत होती , आम्ही एक संपूर्ण दिवस एकत्र घालवला ,खूप सार्या गप्पा मारल्या ,खूप फोटो काढले ,एकत्र जेवलो ,लोकांशी बोलताना उडणारी त्रेधतीरपिट आम्ही एन्जॉय केली ,खरंच खूप अवघड असते ते .... आपलं इम्प्रेशन पाडायची एकाच संधी जेव्हा मिळते तेव्हा बुद्धीचा ,शरीराचा ,मनाचा कसं लागतो ,आग धगधगते अंतर्बाह्य अदृश्य ज्वाललोट उडत असताना तुम्ही हिंद्काळलात तर विषय संपला , आमचे असे झाले तेव्हा एकमेकांना आम्ही सावरत होतो.
झाले ,तो दिवस संपला , मी घरी आलो ,जेवलो झोपलो ,फार विशेष काही वाटले नाही , पण दुसरा दिवस खूप खूप आक्रांदानी पूर्ण असा गेला ,खूप हळवं होवून गेलं मन , आदल्या दिवसाची प्रत्येक घटना डोळ्यासमोरून हुंदक्यासोबत तरळून जात होती . काय सुख मी घेतले अन काय असा आज रिताच होतो , मला प्रत्येक मित्राची ,आठवण दाटून येत होती .रडून रडून मी स्वतःला खोट खोट सावरू पाहत होतो ,पण काहीच फरक पडत न्हवता , आदल्या दिवशी केल्या सर्व घटना पुन्हा घाद्व्यात ,तो दिवस मी परत परत रोजच जगावा ,एवढा एकाच विचार करत होतो मी , आणि म्हणूनच मला रडू कोसळले होते .
मी घरातून बाहेर पडलो ,गणपतीच्या देवळात जाण्याकरिता .तर एक भरधाव तवेरा अंगाला चाटून गेली .. आई शपथ मरता मरता वाचलो मी . मला अजूनच भीती वाटायला लागली ,मी पुन्हा हमसून हमसून रफत होतो , आज मेलो असतो तर , एक मन म्हटलं बराच झाले असते आठवणी काढून काढून रडण्यापेक्षा ,पण लगेच दुसर्या शहाणे मन म्हणाले पण मग मैत्रीचे काय ?? त्यांना कधीच भेटता आले नसते .
हा लेख त्यांच्या परवानगीशिवाय लिहितोय म्हणून त्यांचे नाव सांगणार नाही ,पण ते सर्व माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत ,त्यांना आता दूर लोटणे मला कधीच शक्य नाही होणार , काय माहित मी जगेल कि नाही माझ्या या मित्रांशिवाय ? देवाकडे एकाच गाऱ्हाणे आहे मला यांच्यापासून कधी कधी म्हणजेच दूर नेवू नकोस ,मला मग श्वास घेणेही कठीण होवून बसेल . आज इतके वाईट वाटण्याचे कारण हेच कि जो दिवस आम्ही एकत्र घालवला ,तसा वर्षातून एकच आला ,पुढे किती येतील ठावूक नाही .अपेक्षा मात्र आहे . असे एकदम जवळ येवून पुन्हा दुरावा आल्याने मला खूप गहिवरून आलेले , लिहीन मोकळा झालो तेव्हा जरासे हायसे वाटले आहे .
आमच्या मैत्रीशिवाय मी जिवंत नाही राहू शकत ,तशीच जर वेळ येणार असेल तर मी विष खायलाही तयर आहे .
नको वाटे जगणे ,
असह्य होतेय दुखणे ,
या परी सुखावह असेल ,
विष खावून मरणे..............(विशू)
मैत्रीचा विजय असो
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY