आधी असावी बनवा बनवी
नंतर करावी फेंका फेंकी
यहा सब चलता ही है यारा
बेधडक करावी उडवा उडवी
सगळेच राहती काचेच्या घरात
निर्धास्त असावी तांका झांकी
करून सवरून साळसूद
आरोपात असावी ढकला ढकली
शत्रूंशी घ्यावा खूप बदला
गुन्ह्यात असावी ओढा ओढी
तरी न झाली निर्दोष मुक्तता
बेधडक करावी तोडा फोडी
पुढच्या जन्मी न्याय मिळणार
निसंकोच करावी मारा मारी
कोणी तरी घेइलच अंगावर
आणि करेल सावरा सावरी
-----------------------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY