असेच आहो , सुखांशी भांडतो आम्ही
दुखांच्या घरात सुखाने नांदतो आम्ही !!
सुख आम्हा जड जाते मानवत नाही
दु:ख हे आपुलकीचे जाणतो आम्ही !!
काय असा मोठा फरक सुखात दु:खात
एक कधी दिसेना एकाच्या दारी आम्ही !!
रुसवे फुगवे मोह माया संपणार नाही
तरी बघा त्याच दारी संपणार आम्ही !!
वेड मिटण्याचे,मिटवून बनविण्याचे
कुणासाठी देहाचा पुतळा झालो आम्ही ?
शिडी न रांग , वैकुंठाचे दार बंद
प्रारब्धाबरोबर सतत धावतो आम्ही !!
-------------------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY