आभामंडळाची निर्मिती उगाच होत नसते
त्यासाठी एखादा वर्तुळ शोधावा लागतो
मग त्याचा केंद्र शोधावा लागतो
केन्द्राच्या गुरुत्वाकर्षणाचा ,
मोजमाप घ्यावा लागतो !!
आयुष्यातल्या गरजांनुसार
पुन्हा पुन्हा त्या वर्तुळाला भेदून
आत शिरावं लागतं
आणि गरज संपताचक्षणी
एकही क्षणाचा विसावा न घेता
कोणताही मोह न बाळगता
लगेच बाहेर यावं लागतं !
यालाच आपण तारेवरची कसरत म्हणतो !!
वर्तुळात अडकल्याने
केन्द्राच्या गुरुत्वाकर्षणाचे
दुष्परिणाम भोगावे लागतात
हेच खडतर आयुष्य असतं
बरेचजण याला संसारही म्हणतात
याला आपण जगणंही म्हणू शकतो !!
जगणं म्हणजे खऱ्या अर्थाने
माणसाने माणसासाठी
घडवून आणलेला चमत्कार असतो !!
या वर्तुळात
ताणतणावाची व्यवस्था महत्वाची
सूर्याच्या किरणांपासून
ते चंद्राच्या किरणांपर्यंत
ताणतणाव तारेवरच्या कसरतीचाच भाग असतो !!
सूर्याच्या किरणांच्या उष्णतेपासून
वाढत जाणारा ताणतणाव
चंद्राच्या किरणांसोबत मावळायला हवा
असं झालं तर चंद्र स्वताच प्रत्येकासाठी
एक स्वतंत्र आभामंडळच निर्मित करत असतो !!
——————————————–
विश्वनाथ शिरढोणकर , इंदूर म. प्र.- Halo!!
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY