कधी वाटते आपण जगावे
बघण्यासाठी पोरांचे सुख
कधी वाटते थोडे विसावे
विसरून जाण्यासाठी दु:ख
कधी वाटते खूप हसावे
पाहून आयुष्याचे रूप
कधी वाटते आपण धन्य
बघून पोरांचे गोड सुख
कधी वाटते उरली नाही
आता जगण्यासाठी भूक
कधी वाटते अजून झटावे
देण्या साठी उरले सुख
काही मजला ठाऊक नाही
शिवाय आपल्या पोरांचे सुख
---------------------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY