Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

मी असेन / मी नसेन

 

मी असेन तर काय असेल

मी नसेन तर काय असेल !

तोच मावळता सुर्य असेल

तोच उगवता चंद्र असेल !

स्वर वरचा वर असेल

श्वास तो मोकळा असेल !

पिंपळाची सावली असेल

भरभराटीचा गुलमोहर असेल !

भिंतीवर रंग वेगळा असेल

पाण्यात आलेला गोडवा असेल !

रडण्या कण्हण्याची साक्ष असेल

भिंतीवर मोठा फोटो असेल !

आठवणींच ओझं असेल

विसरण्याचा मंत्र असेल !

वादळ फार उनाड असेल

वाऱ्याची दिशा वेगळी असेल !

दारावर उभी लाज असेल

स्वच्छंदी उंबरठा असेल !

 

 

------------------------

विश्वनाथ शिरढोणकर

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ