मी देव
तो आला
त्याने साष्टांग दंडवत केला
विनम्रतेने हात जोडले
मला हार घातला
नारळ ठेवला
हुंडीमध्ये भली मोठी देणगी टाकली
त्याच्या भ्रष्टाचारात
मला सामील करून घेतले
आनंदाने निघून गेला !!!
मी दगड
तो आला
रडू लागला
दगडाने बोलावे
हा त्याचा आर्त
त्याने डोळे पुसले
फाटलेल्या सदऱ्याच्या
फाटक्या खिशात हात घालून
बराच वेळ
मलाच पाहत उभा होता
मी काहीच बोलत नाही
हे बघून तो निराश झाला
उदास मनाने
निघून गेला !!!
मी राक्षस
तो आला
मी प्रसन्न व्हावे म्हणून
माझ्यासाठी
त्याने
मुक्या प्राण्याचा बळी दिला
बळी स्वीकारल्याने
मी प्रसन्न झालो
हे समजून तो प्रसन्न झाला
समाधानी होऊन
प्रसन्न मनाने
तो निघून गेला
-------------------------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY