निशी म्हणे रे बाबा
केव्हा विकत घेणार चांदोबा
बाबा म्हणाले
जेव्हा गच्चीवर येईल चांदोबा !!
निशी विचारे
ए ! आई मोठी मी केव्हा होईन ?
म्हणाली आई
करू नको मुळीच घाई !!
मल्हार म्हणाला , आबा !
मला बघायचा हंसरा व्हाघोबा
घाबरत म्हणाले आबा
नको रे बाबा !!
हृदया म्हणाली आजी
मला खायची आहे
कारल्याची गोड भाजी
काहीच नाही बोलली
नुसतीच हसली आजी !!
निशी म्हणाली काकू
उड्या मारून थकले
थोडीशी वाकू !
म्हणाली काकू
जास्त नको वाकू !!
हृदया म्हणाली , काका
चाकलेट , बिस्कीटचे झाडं
केव्हा लागतील बागेत ?
काका म्हणाले
जेव्हा दुधाचा पाऊस पडेल बागेत !!
-----------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY