Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

सगळ्यांचं सगळं सगळ्यांसारखंच असतं

 

सगळ्यांचं सगळं सगळ्यांसारखंच असतं
जसं तुझं असतं तसं माझंहि असतं !!

 

माझ्या नजरेला रोखून तुझी नजर असते
तुझ्याच नजरेवर माझिहि नजर असते !!

 

या तुझ्या कवेत माझा जीव गुदमरतो
कळलं मला या जगात सर्व उसनं असतं !!

 

कोणतीही गफलत नको ,हसण्याचे ओझे
दु:खाचा उन्माद,आयुच्याचं गणित असतं !!

 

किती प्रश्नांचे ओझे सतत मनावर तुझ्या
विसर , तुझ्या जवळ काहीचं उत्तर नसतं !!

 

तरी सारखे हेवे दावे ,मिटव आज तंटे सारे
कधीतरी कळेलंच प्रेमात असं काही नसतं !!

 

 

 

विश्वनाथ शिरढोणकर , इंदूर . म. प्र.

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ