थांब !!
आज कविता लिहू नको
आज थोडी प्रार्थना कर
आज थोडा विसावा घे
थोडं इतिहासाला घडू दे !!
शत्रू बनून जग
वा मित्र बनून जग
घाई करू नको
इतिहासाला मातीत मिळविण्याची
इतिहासाला जगू दे
थोडं इतिहासाला घडू दे !!
आता संस्कारांचा पायंडा घाल
थोडे आचरणाचे धडे गिरव
थोडी व्यवहाराची वागणूक शीक
शिस्त बद्ध न्यायाने
शिस्त बद्ध असं नव्याने
थोडं इतिहासाला घडू दे !!
साधू संताना देवा
थोडा शहाणपणा दे
त्याना हि विरक्तिचा
अर्थ कळू दे
उनाड वाऱ्याला
थोडा संथपणा येऊ दे
थोडं इतिहासाला घडू दे !!
पावलो पावली
भोळ्या भाबड्यानां
ही समज दे
त्यांना गुरूलाही ओळखू दे
महागुरूंना ही ओळखू दे
थोडं इतिहासाला घडू दे !!
अमरत्व येथे कुणाला नाही
तुझे न माझे
सर्व अमरत्व
इतिहासातच वाढू दे
हे जगाला कळू दे
थोडं इतिहासाला घडू दे !!
थांब !!
आज कविता लिहू नको
आज थोडी प्रार्थना कर
आज थोडा विसावा घे
थोडं इतिहासाला घडू दे !!
-----------------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY