विखुरलेल्या पाकळ्यांनों
परत एकदा फुलं व्हा
स्वत:च्या वजनाने भारावून
ऐटीत डोलणाऱ्या
हिरव्या नाजूक डाळीवर
परत पुष्पगुच्छ व्हा !!
सुवासानेच अस्तित्व
सुन्दरतेनेच ओढावा
नाजूकता फुलांचा गुण
रूप रंगाने बांधिले
भ्रमिष्ट भवर्यांना
परत मकरंद द्या !!
वेणीचे फुलं असा
स्वनिल नवयौवनाचे
श्रद्धेचे सुमन बना
ज्याच्या त्याच्या आराध्याचे
स्वागताचे हार बना
अत्मियातेच्या बंधनाचे
अंत असूनही साक्ष व्हा
शेवटच्याही भेटीचे !!
-------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY