मी शोधतो कुणाला माझे मला कळेना
मी ज्याचा भुकेला ,येथे नाही तेथे नाही !!
वैरीच भेटतात रस्त्यावर कडे कडेला
जिवलग कुणीच ,येथे नाही तेथे नाही !!
सापळा मीच माझा ओढून नेत आहे
यात्रा कुठे संपते ? येथे नाही तेथे नाही !!
लक्तरे मनाची वेशी वर टांगून आलो
भूक कुठे मिटते? येथे नाही तेथे नाही !!
मी मुका कसा ? तू स्वैरी पोपट जसा
बोलविते धनी , येथे नाही तेथे नाही !!
हा माज हा गर्व कुठे तुला नेई कळेना
ती वाट प्रेमाची ,येथे नाही तेथे नाही !!
तू बदलली नाही बघ मी ही बदललो नाही
तुला मला बदले तो वारा येथे नाही तेथे नाही
---------------------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY